पुणे : जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात यासह समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (१४ सप्टेंबर) शहराच्या बाणेर, पाषाण, बालेवाडी, बोपोडी, औंध, सुतारवाडी, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी आणि सूस या भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. तसेच पालकांनी पाल्यांना शाळा, महाविद्यालयात न पाठवणेच पसंत केले. उर्वरित शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होते.दरम्यान, विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे हुतात्मा बाबू गेनू चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.

शहरातील बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध या भागांत बंद पुकारण्यात आल्याचा संदेश बुधवारी समाजमाध्यमांतून प्रसारित झाला होता. याबाबत मराठा क्रांती मोर्चाकडून बंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या परिसरातील काही शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली होती, तर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयांत न पाठवणेच पसंत केले.या परिसरातून हिंजवडीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सुविधा दिली होती. या भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>शिक्षक भरतीबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाची अपटेड… शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय!

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जालना येथील आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हुतात्मा बाबू गेनू चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. श्रावणी मेमाणे या मुलीच्या हस्ते मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक श्रुतिका पाडळे आणि अन्य कार्यकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. समन्वयक राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब आमराळे, युवराज दिसले आदींच्या मार्गदर्शनाखाली १५० ते २०० कार्यकर्त्यांनी उपोषण केले.

हेही वाचा >>>चिंचवड येथील मंगलमूर्तींची भाद्रपद यात्रा शनिवारपासून

शाळांमध्ये उपस्थिती कमी

पुणे बंदबाबत समाजमाध्यमांतून संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने विद्यार्थी-पालक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पुणे बंदच्या संदेशामुळे काही शाळांच्या स्कूलव्हॅन चालकांनी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर काही शाळांनी पालकांनी आपल्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याबाबतचे संदेश पालकांना पाठवले. त्यामुळे पालकांना मुलांना शाळेत सोडावे लागले. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याने शाळा लवकरच सोडण्यात आल्या. काही शाळा बंद ठेवण्यात आल्याचे चित्र होते.

Story img Loader