मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी १६ नोव्हेंबरपासून सुरु केलेली संवाद यात्रा सोमवारी विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पुण्यात दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात गेल्या दोन वर्षांपासून मोर्चे काढूनही याकडे सरकारने गंभीरपणे पाहिले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने १६ नोव्हेंबरच्या राज्यभरात संवाद यात्रा काढण्यात आली आहे. हा मोर्चा २६ नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अद्यादेश काढावा, जोपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत मराठा समाज आझाद मैदानावरून हटणार नसल्याचे सांगण्यात आले.