पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या लढ्याला यश आल्यानंतर मराठा समाजाती नेत्यांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर यापुढील काळात आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन पातळीवर कायम रहावा, यासाठी ठाम भूमिका घेण्याबरोबरच जरांगे पाटील यांच्यापाठीमागे कायम उभे राहण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत त्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसत्ताने मराठा समाजातील नेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आरक्षण कायदेशीर दृष्ट्या टिकवावे लागेल अशी भूमिका मांडली.

मनोज जरांगे यांनी दिलेला लढा मोठा आहे. याबाबत दुमत नाही. मात्र अध्यादेशातील सगेसोयरे या संदर्भात शंका घेण्यास वाव आहे. यापूर्वीही मराठा समाजाचे मागासलेपणाल न्यायालयीन पातळीवर आव्हान देण्यात आले होते. आताही ही शक्यता नाकारता येत नाही,असे मराठा सेवा संघाचे राजेंद्र कोंढरे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर पुण्यात जल्लोष; पण काही ठिकाणी शांतता

जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या ही समाधानाची बाब आहे. मात्र याला कायदेशीर आव्हान दिले जाऊ शकते. या परिस्थितीत जरांगे यांच्या पाठीशी कायम उभे राहू. कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडू असे रघुनाथ चित्रे यांनी सांगितले.