पुणे : दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा परदेशातील साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. संमेलनास येऊ इच्छिणारे विशेषत: पाकिस्तान, इंग्लड आणि अमेरिकेतील मराठी नागरिक आहेत.

सरहद, पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींप्रमाणे परदेशातूनही रसिक येण्यास उत्सुक आहेत. संमेलनात कसे सहभागी होता येईल, अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने पाकिस्तानातील कराची येथील महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी विशाल राजपूत तसेच लंडन येथील सुजाता गोठस्कर आणि उत्तम शिराळकर यांनी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यासाठी विचारणा केली आहे, अशी माहिती साहित्य संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
sada sarvankar post for raj thackeray support
“माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, मला…”; सदा सरवणकरांचे राज ठाकरेंना भावनिक आवाहन!
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

हेही वाचा – “मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी

हेही वाचा – पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय

दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी इच्छुक असलेल्या विशेषत: पाकिस्तानातील कराची येथील मराठी भाषिक साहित्यप्रेमींसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या तसेच गृहमंत्रालयाच्या माध्यमातून योग्य ती शहानिशा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. परदेशातून साहित्यप्रेमींनी संमेलनास येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्याबाबतचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि संयोजन समिती एकमताने घेईल, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.

Story img Loader