पंजाबमधील घुमानमध्ये होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्या असून, पुढील वर्षी ३ ते ५ एप्रिल दरम्यान हे संमेलन होते आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे मंगळवारी पुण्यात उदघाटन झाले. त्यावेळी तारखांबद्दल माहिती देण्यात आली. यंदा पहिल्यांदाच पंजाबमध्ये साहित्य संमेलन होते आहे.
संमेलन फेब्रुवारीमध्ये घेण्याबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, पंजाबमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका असतो. त्यामुळे संमेलनाच्या तारखा पुढे ढकलण्याचा विचार सुरू झाला. थंडी आणि मुलांच्या परीक्षा या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून संमेलन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे निमंत्रक भारत देसडला आणि संयोजक संजय नहार यावेळी उपस्थि होते.

Story img Loader