८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीचे समर्थन केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे मत मांडले.
ते म्हणाले, देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असून, कोणतीही बुद्धिप्रामाण्यवाद मानणारी व्यक्ती असहिष्णुतेचा विरोधच करेल. त्यामुळे जे साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यांना मी सार्वजनिकपणे पाठिंबा दर्शवितो. मात्र, सातत्याने सरकारशी संघर्ष करण्यापेक्षा चर्चा करण्यावर भर दिला गेला पाहिजे. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader