पिंपरी : महापालिकेच्या सर्व शाळांचे सेमी इंग्रजी व इंग्रजीमध्ये रुपांतर करण्यासाठी पर्यवेक्षकांनी दाेन दिवसांत माहिती देण्याचे तातडीचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण विभागाने काढल्याने गोंधळ उडाला. परिपत्रक समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने महापालिकेच्या मराठी शाळा बंद हाेणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या परिपत्रकातील विषय चुकला असून केवळ शाळांची माहिती मागविल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये १४ ऊर्दू, दाेन हिंदी तर उर्वरित ८९ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. या शाळांमध्ये ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिकेच्या शाळांची माहिती मागविली हाेती. त्यावर शिक्षण विभागाने शुक्रवारी तातडीचे परिपत्रक काढले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू आहे काय? असल्यास काेणत्या वर्गापासून सुरू आहे. तसेच प्रत्येक प्रभागात एक इंग्रजी शाळा सुरू करण्याबाबतचा अहवाल मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने तातडीने दाेन दिवसांच्या आत सादर करावा, जेणेकरून पुढील कार्यवाही करणे साेईस्कर हाेईल, असे परिपत्रक प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी काढले हाेते. त्यामुळे गोंधळ उडाला होता.

हेही वाचा – “महिलांना ६ महिने पगारी मातृत्व रजा द्यावी लागते, त्यामुळे कंपन्या…”; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्याचे मोठे विधान

हेही वाचा – पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट संकेतस्थळ, सायबर चोरट्यांकडून ग्राहकांची फसवणूक

सेमी इंग्रजीच्या शाळेमध्ये गणित आणि विज्ञान हे दाेन विषय इंग्रजी भाषेत शिकविले जातात. महापालिकेच्या किती शाळा सेमी इंग्रजी आहेत. याची केवळ माहिती मागविली आहे. परिपत्रकातील विषय चुकला असून रुपांतर करणे असे नजर चुकीने झाले. सेमी इंग्रजीची माहिती देणेबाबत असा उल्लेख अपेक्षित हाेता. सर्व शाळा सेमी इंग्रजी केल्या जाणार नाहीत, असे नाईकडे यांनी स्पष्ट केले.