बुलडाणा अर्बन को-ऑप. केडिट सोसासटीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त दोन दिवसीय स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले असून, ते आज आणि उद्या (२७ व २८ फेब्रुवारी) या कालावधीत प्रभात रस्त्यावरील बुलडाणा बँकेच्या शाखेत होणार आहे. तसेच नागरिकांना जवळच्या शाखेतही आपली स्वाक्षरी नोंदवून या अभियानात सहभागी होता येणार आहे.
या अभियानाची सुरूवात सकाळी ११ वाजता ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या स्वाक्षरीने होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे अभियाना सुरू राहणार आहे. अभियान दोन गटांत होणार असून, त्यासाठी ४० वयोगट आणि त्या पुढील वयोगट असणार आहेत. अभियानात सुंदर व सर्वोत्तम स्वाक्षरीला प्रथम (११ हजार), द्वितीय (५ हजार), तृतीय (५ हजार) आणि प्रोत्साहनार्थ १ हजार १०० रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

Story img Loader