बारामती : – ऑलिंपिक पदक विजेते बॉक्सर विजेंदर सिंह आणि खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व युवा नेते श्री. युगेंद्रदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे.या वेळी विदेशातील दहा स्पर्धकांसह हजारो स्पर्धक सहभागी होणार आहेत. शरयु फौंडेशन व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तिसऱ्या बारामती हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, बारामती रेल्वे स्टेशन समोरील एम.ई.एस. हायस्कूलच्या प्रांगणातून रविवार ( दि. १६ फेब्रुवारीला ) मॅरेथॉनचा प्रारंभ होणार असून प्रसिद्ध मुष्टीयोद्धा ऑलिंपिक पदक विजेते विजेंदर सिंह प्रमुख पाहुणे म्हणून तर खासदार सौ. सुप्रियाताई सुळे युवा नेते श्री. युगेंद्रदादा पवार उपस्थित राहणार आहेत.
२१ कि. मी. १० कि. मी, ३ कि. मी, फनरन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगळी फनरन आणि यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी आगळ्यावेगळ्या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, या गटात प्रथमच विक्रमी स्पर्धक सहभागी झाले आहेत. २१ कि.मी. ची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता,१० की. मी. सकाळी ६. १५ वाजता, फनरन सकाळी ८.०० वाजता तर दिव्यांग व जेष्ठ नागरिकांची वॉकेथॉन सकाळी ८.३० वाजता चालू होणार आहे.
विजेत्यांना लाखोंची बक्षिसे
बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना लाखोंची बक्षिसे दिली जाणार असून विदेशी स्पर्धकांच्या बक्षिसांची रक्कम वेगळी दिली जाणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून शनिवार (दि १५ फेब्रुवारी )रोजी एम. ई. एस.हायस्कुलच्या प्रांगणात सकाळी ९ ते सायं ६ पर्यँत मॅरेथॉनसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना गुडी बॅग किटचे वाटप करण्यात येणार आहे. बारामतीकरांनी आपल्या या शरयु मॅरेथॉनमध्ये शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व आरोग्यदायी राहण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पवार यांनी केले आहे.