लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भारतासह जगभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये एक समान गुणधर्म संशोधनात आढळून आला आहे. निवडणुकीत मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ही विजयी अंतराच्या सांख्यिकीय वितरणाच्या अंदाजासाठी पुरेशी असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून स्पष्ट झाला असून, या संशोधनासाठी पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) शास्त्रज्ञांनी खास प्रारूप (मॉडेल ) विकसित केले.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?

आयसर पुणे येथील प्रा. एम. एस. संथानम यांच्या नेतृत्वाखाली ‘युनिव्हर्सल स्टॅटेस्टिक्स ऑफ कॉम्पिटिशन इन डेमोक्रॅटिक इलेक्शन’ हे संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा शोधनिबंध फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. या संशोधनाला भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ (सर्ब), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे पाठबळ मिळाले. संशोधनासाठीचे विदा विश्लेषण नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनच्या परम ब्रह्मा या महासंगणकाच्या साहाय्याने करण्यात आले. टोकाच्या भावभावना, स्पर्धा, विचारसरणी आणि काही वेळा हिंसा अशा अस्थिर वातावरणात निवडणुका होतात.

आणखी वाचा-किसन महाराज साखरे यांचे निधन

मात्र, निवडणुकांच्या या गोंधळात काही समान गुणधर्म असतात का, याचा शोध घेण्याचा या संशोधनाचा उद्देश होता. या संशोधनासाठी सहा खंडांतील ३४ देशांतील ५८१ निवडणुकांच्या विदाचा अभ्यास करण्यात आला. मतदार कशा पद्धतीने उमेदवारांची निवड करतात हे अभ्यासण्यासाठी यादृच्छिक मतदान प्रारूप (रँडम व्होटिंग मॉडेल) विकसित करण्यात आले. प्रारूपाचा वापर करून केलेल्या अभ्यासानुसार मिळालेले निष्कर्ष प्रत्यक्ष निवडणूक निकालांशी पूर्णतः जुळणारे होते. १९५२ ते २०१९ या कालावधीतील भारतातील निवडणुकांचा प्रारूपाद्वारे अभ्यास केल्यावर विजयी अंतराचे वितरण इतर देशांतील घटकांशी सुसंगत होते.

प्रा. संथानम म्हणाले, ‘या संशोधनातून, मतदारांचा निवडणुकीतील सहभाग निवडणुकांचे स्वरूप कशा प्रकारे ठरवतो, निवडणुकांची प्रामाणिकता टिकवण्यासाठी विज्ञान कसे मदत करू शकते हे दिसून आले.’

आणखी वाचा-ऑनलाईन, दूरस्थ पद्धतीने एमबीए करण्याची संधी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू

निवडणुकीतील गैरप्रकार ओळखण्यासाठी उपयुक्त

बहुतांश देशांतील निवडणुकांच्या निकालात आढळणारा समान गुणधर्म काही देशांच्या बाबतीत अपयशी ठरल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ, गेल्या दशकातील इथिओपिया आणि बेलारूसमधील निवडणुकांमध्ये समान गुणधर्मापेक्षा तफावत आढळली. तत्कालीन निवडणुकांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि नागरी संस्थांनी संशयास्पद ठरवले होते. या अनुषंगाने प्रारूपाद्वारे केलेले विश्लेषण जगभरातील निवडणूक गैरप्रकार ओळखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Story img Loader