रोकडरहित व्यवहाराकडेही व्यापाऱ्यांचा कल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे बाजार आवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्केट यार्डातील व्यवहार नोटाबंदीनंतर कोलमडून पडले. व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतर मार्केट यार्डातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. भुसार आणि भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यावर अद्यापही परिणाम जाणवत असला, तरी भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी आता रोकडरहित व्यवहाराला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मार्केट यार्डातील बहुतेक सर्व व्यवहार रोखीत स्वरूपात व्हायचे. बाहेरगावाहून शेतीमाल घेऊन येणारे मालवाहतूकदार आणि शेतकऱ्यांना पैसे रोखीत दिले जायचे. त्यामुळे बाजार आवारात दररोज रोकड व्यवहारांना मोठे महत्त्व होते. नोटाबंदीनंतर मार्केट यार्डातील व्यवहार जवळपास ठप्प झाले. सुरुवातीच्या काळात व्यापारी काहीसे गोंधळून गेले.

निश्चलनीकरणाच्या निर्णयाला पन्नास दिवस झाल्यानंतर मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात काय परिस्थिती आहे या बाबत प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, की सुरुवातीला गोंधळ उडाला होता. अनेक विक्रेत्यांनी सुरुवातीला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या.

मार्केट यार्डमध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसेच सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये अनेक विक्रेत्यांचे चालू खाते आहे. या खात्यात नोटा जमा करण्यात आल्या. बाजार आवारात जवळपास साठ बँकांच्या शाखा असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ानंतर बाजार आवारातील परिस्थिीतीत सुधारणा झाली. काही प्रमाणात गैरसोय देखील झाली. परराज्यातून शेतीमाल घेऊन येणारे मालवाहतूकदार आणि शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पैसे देण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, तो प्रश्न देखील मार्गी लागला. आरटीजीएस तसेच धनादेशद्वारे पैसे दिले जात आहेत.

नोटाबंदीमुळे व्यवहारांवर परिणाम झाला. तीस टक्क्य़ांनी व्यवहार घटले. दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यानंतर व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले म्हणाले, की सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरले. कारण बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. पंजाब, राजस्थानातील शेतकरी आणि मालवाहतूकदारांना मालाचे पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे भुसार बाजारातील व्यवहारांवर मोठा परिणाम जाणवत होता. जवळपास तीस टक्क्य़ांनी व्यवहार घटले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रोकडरहित व्यवहार करण्यास सुरुवात केली. रोकडरहित व्यवहारांकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे.

स्वाइप मशीनचा वापर सुरू

भुसार बाजारात जानेवारी आणि फे ब्रुवारी महिन्यात किरकोळ ग्राहक वर्षभराचे धान्य घेण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वाइप मशिनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. घरगुती ग्राहकांकडून वर्षभरासाठी तांदूळ, गहू, ज्वारी खरेदीचे प्रमाण या हंगामात मोठे असते. त्यामुळे रोकडरहित व्यवहाराला अनेक व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिले आहे, अशी माहिती प्रवीण चोरबेले यांनी दिली.

रोकडरहित व्यवहारांवर बँकाकडून कमिशन आकारण्यात येते. हे कमिशन एक ते दीड टक्क्य़ांपर्यंत असते. मुळात भुसारबाजारातील व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार एक ते दीड टक्के कमिशनवर चालतात. त्यामुळे बँकांकडून कापण्यात येणारे कमिशन हे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे पुणे र्मचट्स चेंबरकडून पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

-प्रवीण चोरबेले, अध्यक्ष पूना र्मचट्स चेंबर