लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजार, तसेच उपबाजराचे कामकाज बंद राहणार आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) मार्केट यार्डातील बाजार आवारास साप्ताहिक सुट्टी राहणार आहे.

अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस मार्केट यार्डाचे कामकाज बंद राहणार आहे. शुक्रवारी (२९ सप्टेंबर) मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभाग, फूल बाजार बंद राहणार आहे. खडकी, मोशी, मांजरी येथील उपबाजारांचे कामकाज बंद राहणार आहेे.

हेही वाचा… पुण्यात क्रिकेट विश्व चषकाची वाजतगाजत मिरवणूक, ‘सेल्फी’काढण्याचीही संधी, रोहित पवार म्हणाले…

शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये. असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव राजाराम धोंडकर यांनी केले आहे. मार्केट यार्डाच्या आवारातील बाजार समितीचा पेट्रोल पंप दोन दिवस बंद राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market yard closed for two consecutive days after anant chaturdashi in pune print news rbk 25 dvr