लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: हुंडा म्हणून बेड, गादी तसेच टेम्पो घेण्यासाठी एक लाख रुपये माहेराहून आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मुळशीतील मारुंजी येथे घडली.

२३ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती राहुल सदाशिव कराड, सासरे सदाशिव कराड आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीचे वडील तुकाराम सुदाम केंद्रे (वय ५३, रा. अहमदपूर, जिल्हा लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… पुणे : हंगेरीतील पत्नी आणि भारतातील पतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘असा’ घेतला घटस्फोट

फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी राहुल यांचा ७ मे २०१९ रोजी विवाह झाला होता. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन विवाहितेला त्रास दिला जात होता. लग्नात हुंड्यामध्ये बेड आणि गादी दिली नसल्याच्या कारणावरुन मानसिक त्रास दिला जात होता. पती राहुल हा टेम्पो विकत घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करत होता. त्यासाठी वेळोवेळी मानसिक, शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने रविवारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader