लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: शेजाऱ्यांच्या त्रासामुळे महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. या प्रकरणी एका दाम्पत्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शाहीन अत्तार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर लटके आणि त्याची पत्नी शीतल (दोघे रा. कोलवडी, ता. हवेली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाहीनचे पती शौकत यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अत्तार आणि लटके दाम्पत्य शेजारी आहेत. त्यांचे चांगले संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून लटके दाम्पत्य शाहीनच्या चारित्र्यावर संशय घेत होते. शाहीन मोबाइलवर कोणाशी बोलते. हे तुझ्या पतीला सांगतो, अशी धमकी ज्ञानेश्वर लटकेने तिला दिली होती. लटके दाम्पत्याच्या त्रासामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची फिर्याद शाहीनच्या पतीने दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married woman commits suicide due to neighbours trouble pune print news rbk 25 mrj
Show comments