पुणे : स्वदेशी प्रजातीचे देखणे आणि लढाऊ वृत्तीचे अश्व पाहण्याची संधी पुण्यातील अश्वप्रेमींना मिळणार आहे. इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे शनिवारपासून (२५ फेब्रुवारी) दोन दिवस रेसकोर्स येथे ‘मारवाडी हॉर्स शो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोड्यांच्या वयोगटानुसार सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये मिल्क टीथ फिली, मिल्क टीथ कोल्ट, टू टीथ फिली, टू टीथ कोल्ट, मेअर अँड स्टॅलिअन या प्रकारातील नर आणि मादी अश्वांचा समावेश असणार आहे. देशभरातून शंभरहून अधिक अश्व या स्पर्धेत सहभागी होणार असून महाराष्ट्रासहित पंजाब, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून हे अश्व येणार आहेत. विभागानुसार, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अश्वांना रविवारी ( २६ फेब्रुवारी) पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

हेही वाचा – काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका?

हेही वाचा –  “भाजपासह गद्दारांना धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या”, आदित्य ठाकरेंचे आवाहन

इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय नेन्सी म्हणाले, मारवाडी अश्व हे देखण्या स्वरुपातील भारतीय प्रजातीतील घोडे असून, लढाईतील निष्ठा आणि शौर्य यासाठी ही प्रजात ओळखली जाते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्याकडील अश्वांच्या प्रजाती भारतात आणून त्यांना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे साहजिकच भारतीय प्रजातीतील या घोड्यांचे जतन व संवर्धन कमी झाल्याने, दिमाखदार अशा मारवाडी अश्वांची प्रजाती मागे पडली. आता भारतात या मारवाडी प्रजातीच्या घोड्यांचे जतन आणि पालनपोषण करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच आम्ही गेली सहा वर्षे ‘मारवाडी हॉर्स शो’चे आयोजन करत आहोत. त्याला नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच गेल्या काही वर्षांत मारवाडी घोड्यांचे पालनपोषण करण्याकडे कल वाढल्याने त्यांची संख्यादेखील वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marwari horse show for two days from saturday in pune pune print news vvk 10 ssb