पुणे : पुण्यातील कोंढवा रोडवरील विविध साहित्यांच्या तब्बल २० गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा – जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर, वाविलाला चिद्विलास रेड्डी देशात पहिला
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा रोडवरील गंगाधाम चौकाजवळ असलेल्या आईमाता मंदिराजवळ बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग यासह इतर साहित्यांच्या तब्बल २० गोडाऊनला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या सर्व गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले असून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २२ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहे. तर या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.