पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमध्ये पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी महानगरपालिकेची नऊ अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी असल्याचं बोलले जात आहे. चिखलीत अनेक अनाधिकृत गोडाऊन आहेत. भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु, चिरीमिरीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी अनाधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – तडीपार गुंडाला येरवड्यात पकडले

हेही वाचा – जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

चिखलीमध्ये नेहमीच आगीच्या घटना घडतात. आज दहाच्या सुमारास चिखली-कुडाळवाडी येथे गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहेत. चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसाय आणि गोडाऊन असल्याने त्या ठिकाणी नेहमीच आग लागते. यावर महानगरपालिकेने कायमचा तोडगा काढणे देखील गरजेचे आहे. कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे. अनेक नागरिक हे चिखली परिसरात राहतात. या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोकादेखील उद्भवू शकतो हे नाकारता येत नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire at godown in pimpri chinchwad a few kilometers of smoke kjp 91 ssb