पुुणे : मंडई परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले मेट्रो स्थानकात रविवारी रात्री बाराच्या सुमारास आग लागली. मेट्रो स्थानक बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात मंडई मेट्रो स्थानकाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले होते.

मंडईतील मेट्रो स्थानकाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. मेट्रो सेवा गेल्या महिन्यात सुरु झाली. मेट्रो स्थानकात किरकोळ कामे सुरू आहेत. रविवारी रात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्थानकातील तळमजल्यावर वेल्डींगचे काम सुरू होते. त्यावेळी शेजारी ठेवलेल्या फोमवर ठिणगी पडल्याने भडका उडाला. फोमने पेट घेतल्यानंतर मोठा धूर झाला, तसेच तळमजल्यावरील साहित्याला आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे घबराट उडाली.

female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Punekar young girl misbehaviour on the street
पुणेकर तरुणीचा भररस्त्यावर हुल्लडपणा! धावत्या पीएमटीच्या समोर येऊन दुचाकीवर स्टंटबाजी, VIDEO पाहून संताप येईल
uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Ravichandran Ashwin takes a stunning sideways running catch
Ravichandran Ashwin : अश्विनने मागे धावत जाऊन घेतला कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कॅच, VIDEO होतोय व्हायरल
two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मार करुन पाच मिनिटात आग आटोक्यात आणली. स्थानकातील तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने जवानांनी विशिष्ट पोषाख वापरुन आत प्रवेश केला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत जवान तेथे होते. आग पूर्णपणे आटाेक्यात आल्याची खात्री झाल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.

सुदैवाने गंभीर दुर्घटना टळली

शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी मंडईत खरेदीसाठी गर्दी झाली होती. पिंपरी-चिंचवड, तसेच उपनगरातील नागरिक मेट्रोने सहकुटुंब खरेदीसाठी मेट्रोने आले होते. मंडई मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर पाच मिनिटांत तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावर पोहोचता येत असल्याने अनेकांनी वाहनांऐवजी मेट्रो सेवेने खरेदीसाठी येण्यास प्राधान्य दिले. गर्दीच्या वेळेत मेट्रो स्थानकात आग लागली असती तर प्रवाशांमध्ये घबराट उडाली असते. आग लागली तेव्हा मेट्रो स्थानक बंद होते. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली.

निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीत उद्घाटन

मेट्रोचे काम अर्धवट असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटन करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने वर्दळीच्या वेळेत आग लागली नाही. अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असते. मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण व्हायचे आहे. प्रत्येक कामासाठी विशिष्ट वेळ देणे गरजेचे आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे गडबडीत उद्घाटन करण्यात आले. असे प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी समाजमाध्यमात ‘मेट्रो स्थानकातील आग नियंत्रणात. प्रवासी सेवेवर कोणताही परिणाम नाही,’, असा संदेश प्रसारित केला.

मेट्रो स्थानकात मध्यरात्री बाराच्या सुमारास वेल्डींगचे काम सुरू होते. ठिणगी उडाल्याने तळमजल्यावर ठेवलेल्या फोमने पेट घेतला. फोमने पेट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने घबराट उडाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे पाच मिनिटात आग आटोक्यात आली. – संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक