पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.ही आग विझविण्यासाठी १० अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.तसेच आगीच् नेमक कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग लागल्याची माहिती १ वाजून ६ मिनिटांनी आम्हाला मिळाली. त्यानुसार आम्ही पुढील काही मिनिटात घटनास्थळी दाखल झालो आणि तोवर शहरातील अनेक भागातील अग्निशामक दलाच्या जवळपास १० गाड्या, पाच अधिकारी,पन्नास जवानांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरु केले. दत्त मंदिर आणि इतर कोणत्याही इमारतीला या आगीची झळ बसू नये म्हणून काका हलवाई दुकानामध्ये प्रवेश करुन तसेच रस्त्यावरील बाजूने शिडी लावून चारही बाजूने पाण्याचा मारा करून तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.पण या लाकडी वाड्याच्या तळमजल्यावर असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसली असून या आगीचे नेमक कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.