पिंपरी-चिंचवड मध्ये मोशी येथे लाकडाच्या गोडाऊन भीषण आग लागली. मध्यरात्री एकच्या सुमारास घटना घडली. घटनेनंतर तात्काळ १२ अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहोचली. शर्थीच्या प्रयत्नानंतर काही तासात आगीवर नियंत्रण मिळवल असल तरी अद्यापही कुलिंग चे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आग लागण्याचे अद्याप कारण समजू शकेल नाही.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी येथे लाकडाच्या गोडाऊनला आणि भंगाराच्या साहित्याला भीषण आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट काही किलोमीटरवरून दिसत होते. काही वेळातच लाकडांना आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचे तोपर्यंत लाकडाची वखार मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली होती. भंगारच साहित्य देखील जळून खाक झालं होतं. घटनास्थळी १२ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या.
शर्थीच्या प्रयत्नानंतर काही तासात आगीवर नियंत्रण मिळवल आहे. दहा तासानंतरही आग धुमसत असून कुलींचं काम सुरू आहे. घटनास्थळी अद्यापही दोन अग्निशमन दलाची वाहन आहेत. या घटनेमुळे लाखोंचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. अद्याप अग्निशमन दलाकडून याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही.