लोणावळा : सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मुंबईहून मोटारीतून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. अमृतांजन पूल ते खोपोली बाह्यवळण परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळी सुट्टीमुळे मुंबई-पुणे, तसेच राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल होत आहे. शनिवार आणि रविवारच्या सुटीमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. मुंबईतील पर्यटक सहकुटुंब मोटारीतून लोणावळ्यात दाखल झाले. त्यामुळे शनिवारी सकाळपासून द्रुतगती मार्गावर विस्कळीत झाली. घाट क्षेत्रात वाहनांचा वेग संथ झाल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांनी खंडाळा बोगद्याजवळ सर्व वाहने थांबविली. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सहा मार्गिका खुल्या करून देण्यात आल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी अवजड वाहने लोणावळा बाह्यवळण परिसरात थांबविण्यात आली.

हेही वाचा…पिंपरी : महापालिकेचा ‘डीबीटी’ला हरताळ!

उन्हाळी सुटी संपत आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा आणि खंडाळा परिसरात दाखल होत आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी झाली होती. पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्ला लेणी, लोहगड, खंडाळा राजमाची पॉईंट , टायगर पॉईंट , पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive influx of tourists in lonavala causes traffic jam on mumbai pune expressway over holiday weekend pune print news rbk 25 psg
Show comments