पुणे : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडबे प्रदूषक मिसळतात. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वसनास त्रास होतो. आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत योग्य काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

दिवाळीच्या काळात आनंद साजरा करण्यासाठी फटाके मोठ्या प्रमाणात वाजविले जातात. सर्वसाधारणपणे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत फटाके वाजविण्यात येतात. यामुळे हवेतील घातक वायूंचे प्रमाण संध्याकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत वाढलेले असते. इमारतीच्या आवारातच रहिवासी फटाके वाजवितात. या फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यासही जागा नसते. त्यामुळे घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणात ही विषारी हवा दीर्घकाळ राहते. या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होतो.

firecrakers side effects on body
फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Alibaug Police raid, fake cigarette company
अलिबाग : बनावट सिगारेट कंपनीवर पोलिसांचा छापा, पाच कोटींचा मुद्देमाल जप्त
D. Y. Chandrachud
CJI D Y Chandrachud : “वाढत्या प्रदूषणामुळे मी आता रोज…”, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचं वक्तव्य चर्चेत
Supreme court on Delhi Air Pollution
Delhi Air Pollution : “पर्यावरण संरक्षण कायदा दंतहीन”, दिल्लीतील वायू प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे!
crops damage in Maharashtra
राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
Air quality in Mumbai, Mumbai air quality index,
मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘चांगली’, शनिवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४५ वर
pcmc air pollution
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल; हॉटेल, ढाबा, बेकरीसाठी गॅसचा वापर सक्तीचा

आणखी वाचा-एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट, दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ

फटाक्यांच्या धुरामुळे खोकला, छातीतून घरघर आवाज येणे आणि घशाला खवखव असे त्रास लगेच सुरू होतात. याचबरोबर दिवाळीनंतर दम्यासह इतर गंभीर श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. हवेतील प्रदूषकांची वाढती पातळी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय धोकादायक असते. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने ते आजारी पडण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.

निरोगी व्यक्तींनाही धोका

फटाक्यांच्या विषारी धुराचे निरोगी व्यक्तींवरही दीर्घकाळ परिणाम होतात. विषारी हवा थेट व्यक्तींच्या फुफ्फुसात जाते आणि तेथून ती रक्तात मिसळते. त्यात पेशींना सूज येण्यासोबत त्यांना हानीही पोहोचू शकते. यातून निरोगी व्यक्तींमध्ये दम्यासह इतर गंभीर श्वसनविकार उद्भवतात. हवा प्रदूषणामुळे धमनी काठिण्याची समस्या निर्माण होत असल्याची बाबही आता समोर आली आहे. यातून हृदयविकाराचा धोका वाढत आहे.

आणखी वाचा-जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की

काळजी काय घ्यावी?

  • श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना फटाक्याच्या धुरापासून दूर राहावे.
  • फटाक्यांच्या धुरापासून संरक्षणासाठी मास्कचा वापर करावा.
  • कमीत कमी धूर निर्माण करणाऱ्या पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करावा.
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घ्यावी.
  • श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी घरात धूप, अगरबत्ती लावू नये.

पुण्यातील हवेची पातळी आधीच खराब आहे. त्यातच फटाके वाजविल्यामुळे हवा आणखी दहापटीने खराब होते. या विषारी हवेमुळे दिवाळीनंतर श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी दिवाळीत मास्कचा वापर करायला हवा. -डॉ. संजय गायकवाड, श्वसनविकारज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय