पुणे : मास्टरकार्ड कंपनीने पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. कंपनीच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात हे केंद्र महत्वाची भूमिका बजाविणार आहे. या ठिकाणी सुमारे सहा हजार तंत्रज्ञ आणि अभियंते कार्यरत असल्याने हे मास्टरकार्डचे हे जगातील सर्वांत मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे.

मास्टरकार्डचे अध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एड मॅकलॉघ्लिन यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्धाटन मंगळवारी झाले. यावेळी बोलताना एड मॅकलॉघ्लिन म्हणाले की, मास्टरकार्डच्या जागतिक तंत्रज्ञान धोरणात पुण्यातील केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. आमच्या जगभरातील तंत्रज्ञान विभागांमध्ये हा महत्वाचा दुवा असेल. हे केंद्र इतर तंत्रज्ञान केंद्रासोबत जगाला आकार देणाऱ्या आणि अर्थव्यवस्थांना भक्कम करणाऱ्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाची उभारणी करेल.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
balrangbhumi sammelan pune
पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात, संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये पुण्यातील शाळा ठरल्या मानकरी… कोणत्या शाळांना मिळाली पारितोषिके?

या केंद्रात सॉफ्टवेअर विकासापासून, वित्त, विदा, विदा संरचना आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञ कार्यरत असतील. सध्या मास्टरकार्डची पुण्यासह अर्लिंग्टन, डब्लिन, न्यूयॉर्क, सेंट लुईस, सिडनी आणि व्हँक्यूव्हर येथे तंत्रज्ञान केंद्र आहेत. पेमेंट सुरक्षा, सायबर सुरक्षा, फसवणुकीचा शोध आणि डिजिटल ओळख या माध्यमातून मास्टरकार्डच्या जागतिक सेवेत योगदान देईल. याचबरोबर भारतात वित्तीय समावेशनासाठीचा कम्युनिटी पास मंच आणि पेमेंट पासकी सेवेची सुरूवात करण्यात हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल.

यावेळी बोलताना मास्टरकार्डचे दक्षिण आशिया अध्यक्ष गौतम अग्रवाल म्हणाले की, भारत मास्टरकार्डसाठी अतिशय महत्वाचा आहे. आम्ही डिजिटल अर्थव्यवस्थेला संपूर्ण खंडात कार्यान्वित करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानासाठी भारतात गुंतवणूक केली आहे. पुण्यातील आमचे नवीन तंत्रज्ञान केंद्र हे एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील आमचे कर्मचारी जागतिक तांत्रिक प्रगतीला पाठबळ देत आहेत. याचबरोबर भारत सरकारची महत्त्वाकांक्षी डिजिटायझेशन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसह काम करण्यास उत्सुक आहोत.

आणखी वाचा-‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपींकडून मद्य, अमली पदार्थांचे सेवन

पुणे तंत्रज्ञान केंद्रात मास्टरकार्डचे कर्मचारी जगासमोरील गुंतागुंतीच्या तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य करतात. यामुळे सुरक्षित, अखंड, आणि कार्यक्षम व्यवहारांसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची विश्वसनीयता निश्चित होते. नवीन सुविधेचे उद्दिष्ट मास्टरकार्डचा जागतिक चमू आणि भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील परिसंस्था यांच्यातील सहकार्य वाढविण्याचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Story img Loader