आज फलटणकरांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह वैष्णवांच्या मेळय़ाचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले. हरिनामाचा गजर आणि विठ्ठल रखुमाईच्या भावरसात सायंकाळी पालखी सोहळय़ाने एक दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीत प्रवेश केला. फलटणकरांनीही पंरपरेप्रमाणे पालखी सोहळय़ाचे आणि वारकऱ्यांचे दिमाखदार स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरडगावचा मुक्काम संपवून पालखी सोहळा सकाळी सहा वाजता फलटणच्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाला. पालखी सोहळय़ाबरोबरचे वारकरी, भाविकही रवाना झाले. आजचा तरडगाव ते फलटण हा पालखी सोहळय़ाचे अंतर अठरा किलोमीटर एवढा मोठा असल्याने हरिनामाच्या आणि टाळमृदंगाच्या नादात पालखी सोहळा मार्गस्थ झाला होता. माउलींच्या रथापुढे मानाच्या िदडय़ा, पुढे सनई चौघडा वाजविणारी बलगाडी, त्यामागे चोपदारांचा अश्व चालत होते. रथाच्या मागे अधिकृत िदडय़ांचे वारकरी चालत होते.

दुपारच्या न्याहरीसाठी सुरवडी तर जेवणासाठी िनभोरे आणि संध्याकाळचा वडजलच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा फलटणच्या वेशीवर पोहोचला. आजूबाजूच्या गावांनी वारकऱ्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली होती. पुन्हा दोन वाजता सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता सोहळा फलटणच्या जिंती पुलावर आला. पालिका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी विजय देशमुख, नगराध्यक्षा सारिका जाधव, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुजवटे, मुख्याधिकारी धनंजय जाधव, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत पालखी सोहळय़ाचे स्वागत करण्यात आले. राम मंदिर ट्रस्ट व नाईक-िनबाळकर देवस्थान ट्रस्टचे संजीवराजे नाईक निंबाळकर व यशोधराराजे नाईक निंबाळकर यांनीही स्वागत केले. यानंतर हा सोहळा मलठण, सद्गुरू हरीबुवा महाराज समाधी मंदिर,पाचबत्ती चौक, बादशाही मशिद, राम चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका माग्रे विमान तळावर मुक्कामासाठी सहा वाजता विसावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mauli palkhi entered in phaltan
Show comments