पिंपरी : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. हे वाढीव मतदान राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला, की ‘मावळ पॅटर्न’ला धक्का देणार हे शनिवारी स्पष्ट होईल.
मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि याच पक्षाचे बंडखाेर, महायुतीमधील नाराज, महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले बापू भेगडे यांच्यासह सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या ‘मावळ पॅटर्न’मुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातूनच प्रचारात आणि त्यानंतर मतदानातही माेठी चुरस दिसून आली. आराेप-प्रत्याराेपाने ही निवडणूक गाजली. आमदार शेळके यांच्यावर नाराज असलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
हेही वाचा – प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार?
मावळ मतदारसंघात ३ लाख ८६ हजार १७२ मतदार आहेत. त्यांपैकी १ लाख ४४ हजार २१४ पुरुष, १ लाख ३६ हजार १०२ महिला, तृतीयपंथी तीन असे दोन लाख ८० हजार ३१९ म्हणजेच ७२.५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. २०१९ च्या निवडणुकीत ७१.१६ टक्के मतदारांनी मतदान केले हाेते. यंदा ३२ हजार ३५८ मतदान अधिक झाले आहे.
हेही वाचा – कंत्राटी कामगारांना कार्यालयात मोबाइल वापरण्यास बंदी, पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय
दाेन्ही उमेदवार तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहेत. प्रचारात स्थलांतरित उद्योग, वाढती गुन्हेगारी हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे या ठिकाणी काेणाला किती मते मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लाेणावळा, वडगाव, देहूराेड आणि देहूगाव या शहरी भागातील आणि पवन, आंदर, नाणे मावळ या ग्रामीण भागातील मते काेणाच्या पारड्यात झुकतात यावर विजयाचे समीकरण अवलंबून राहील.