अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट कशी पडेल आणि अजित पवारांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. शेळके यांनी अद्याप कुणाचं नाव स्पष्ट केलेलं नाही. परंतु, त्यांचा रोख हा त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा लढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांचा रोख बापू भेगडे यांच्याकडे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा >>> ‘परिवर्तन महाशक्ती’चे १५० जागांवर एकमत
शेळके म्हणाले, महायुतीचे नेते मावळ च्या उमेदवारा मागे ठाम राहतील. लोकसभा निवडणुकीत एकसंघ काम केलं. त्यातून उमेदवाराला विजयी मताधिक्य मिळालेलं आहे. पुढे ते म्हणाले, मावळ विधानसभा मतदारसंघात कुठला उमेदवार द्यायचा हे निश्चित झालं नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून आम्ही आग्रही आहे. माझ्यासह इतर काही जण इच्छुक आहेत. यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. पुढे ते म्हणाले, जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही. तोपर्यंत उमेदवारी मिळावी म्हणून मी कुणाच्या घरी जाणार नाही. मलाच उमेदवारी म्हणून आग्रही नाही. शिफारस करणार नाही. अस ही शेळके यांनी स्पष्ट केलं. भेगडे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर देखील शेळके यांनी मत व्यक्त केलं.
हेही वाचा >>> ब्राह्मण समाज महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीवरून देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांकडे नाराजी
ते म्हणाले, इच्छुक राहणं हे गैर नाही. हा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे स्वागत करायला हवं. पुढे ते म्हणाले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कशी फूट पडेल?,अजित पवारांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील. यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडू. आमच्या पक्षातील एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यास कुणी- कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाव व्यासपीठावर जाहीर करणार. असा थेट इशारा देखील शेळके यांनी दिला आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास एकसंघ राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
बापू भेगडे नेमकं काय म्हणाले होते? महामंडळाचा उपाध्यक्ष म्हणून स्थान मला स्थान दिले. ज्या कार्यकर्त्यांनी मागितल त्यांना द्या. मला महामंडळ नको. मावळ विधानसभेची उमेदवारी मला मिळेल याची खात्री आहे. निकाल वेगळा लागला, तर राष्ट्रवादी चे माझे कार्यकर्ते एकत्र बसून यावर विचार करून निर्णय घेणार.