पुणे : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची विजयी घोडदौड सुरू आहे. जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विरोधी उमेदवाराला त्यांची जागा मावळच्या मतदारांनी दाखवून दिली, असा टोला यावेळी बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात लाखोंच्या फरकाने निवडून येणार ये आधीच सांगितलं होतं. माझ्यावर मतदारांनी विश्वास ठेवून कौल दिला आहे. महायुती आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पिंपरी- चिंचवड शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. पुढे ते म्हणाले, पिंपरी- चिंचवडच्या एक लाख मतदारांनी मला पाठिंबा दिला.

हेही वाचा…“वादळ छातीवर झेलण्याची ताकद शरद पवारांनी दाखवली”, सुरुवातीच्या कलांवर काय म्हणाले अमोल कोल्हे?

महाराष्ट्रातील चित्र वेगळं असताना मला लाखो ची लीड मिळाली आहे. पुढे ते म्हणाले, विजयाचे श्रेय महायुतीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, मावळ मतदारांना आहे. हॅट्रिक होणार हे मी आधीपासून सांगत होतो. विरोधकाने वेगळं चित्र रंगवलं. ही निवडणूक नात्या- गोत्याची नव्हे तर देश हिताची होती. विरोधकांकडे दाखवण्यासाठी काम आणि चेहरा नव्हता. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले पण त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली आहे. अस ही बारणे म्हणाले आहेत.

Story img Loader