पिंपरी -चिंचवड: शिवसेना महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना मावळमधून उमेदवारी मिळाली असली तरी बारणे यांच्या पुढील अडचणी संपायचं नाव घेत नाहीत. मावळ लोकसभेतील निर्णायक मतदारसंघ म्हणून चिंचवडकडे पाहिलं जातं. चिंचवडमधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची मानसिकता नसल्याचं नुकत्याच झालेल्या बैठकीत म्हटलं आहे. यामुळं भाजमधूनच श्रीरंग बारणे यांना विरोध वाढला आहे. दुसरीकडे नाराज नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न श्रीरंग बारणे करत आहेत.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडवर पाणीटंचाईचे संकट?… पवना धरणातील पाणीसाठ्यात घट

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीकडून बारणे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरीही बारणे यांना मावळ लोकसभा सोपी जाणार नाही. बारणे यांनी अनेकांची मने दुखावली आहेत, अस बोललं जातं. नुकतीच चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या विरोधात नाराजी सूर काढत रोष व्यक्त केला आहे. बारणे आणि जिल्हाध्यक्ष यांच्या समोर बारणे यांनी आम्हाला भेटावं आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. हे सर्व पाहता श्रीरंग बारणे यांची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभेसाठी नेहमीच निर्णायक ठरला आहे. चिंचवडमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहे.