मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने कर्जत तालुक्यात मोठी हानी झाली. झाडे पडली आहेत, घरावरील पत्रे उडून गेली आहेत. वीज खंडित झाल्याने मतदान केंद्रावरील मतदान दोन-तीन तासांपेक्षा अधिक काळ खोळंबळे आहे. त्या तालुक्यात मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा किंवा फेर मतदान घ्यावे, अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. तसा पत्रव्यवहार राज्य आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना केला असल्याचं बारणे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या निकालात वाढ, राज्याचा निकाल किती?
हेही वाचा – शिरूरमध्ये मतदानापूर्वीच मतदानयंत्रे पडली बंद, झाले काय?
श्रीरंग बारणे म्हणाले, सकाळपासून झालेले मतदान बघता जवळपास ५५ टक्केपर्यंत मतदान जाईल असा अंदाज आहे. मतदारांनी मोठ्या उत्साहात देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले. त्या मतदारांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. मावळ लोकसभा मतदारसंघामधील रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. कर्जत तालुक्यामध्ये वीज खंडित झाली. अनेक ठिकाणी झाडे पडली. मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केली आहे. विजेअभावी ज्या मतदान केंद्रांवर दोन-तीन तास मतदान होऊ शकलं नाही. तिथे वेळ वाढवून देण्यात यावा अन्यथा फेर मतदान घ्यावे, अशी मागणी श्रीरंग बारणे यांनी केली आहे.