पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटपाचे धोरण निश्चित झाले असल्याचे सांगितले जात असतानाच मावळ लोकसभेवरून महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. कारण, भाजपचे माजी राज्यमंत्री, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून उर्से टोलनाक्यावर फलक झळकले आहेत. यामुळे मावळवरून महायुतीत तिढा वाढण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवसेनेचे मावळवर वर्चस्व आहे. आता शिवसेनेतील फुटीनंतर परिस्थिती बदलली आहे. खासदार श्रीरंग बारणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असले, तरी मावळच्या जागेवर भाजप, अजित पवार गटाकडून दावा केला जाऊ लागला आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून मावळमध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली पकड असल्याचे सांगत अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जागेवर दावा केला आहे.

Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitin Gadkari , Lok Sabha Election, Violation Petition ,
नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस, खासदारकी रद्द करण्याची याचिकेद्वारे मागणी
Bharat Gogawale, Aditi Tatkare, Raigad Guardian Minister, Raigad ,
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदारांचे लॉबींग
nagpur winter session, Eknath shinde, uddhav thackeray
नागपूर : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी… “
Beed District Sarpanch murder , Sarpanch murder,
बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, विधानसभेत काय घडले?
Narendra Bhondekar, Narendra Bhondekar Bhandara ,
फडणवीसांचाच प्रस्ताव स्वीकारायला हवा होता… शपथविधीनंतर शिंदेंच्या आमदाराकडून उघड…
BJP challenge to Eknath Shinde by including Ganesh Naik in cabinet
गणेश नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपाचे शिंदेंना आव्हान?

हेही वाचा : मावळमध्ये खासदारकीसाठी महायुतीमध्ये तीन पायांची शर्यत, आता बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

तर, जर पक्षाने लढ म्हणून सांगितले. तर, माझ्यापेक्षा माझे कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत, असे सांगत भाजपच्या बाळा भेगडेंनी तयारी दर्शविली असतानाच आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या फलकांवर भावी खासदार असा उल्लेख केला आहे. वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा एकदा आपण इच्छुक असल्याचे भेगडे यांनी स्पष्ट केले. उर्से टोलनाक्यावर हे फलक झळकले आहेत. भावी खासदार संजय उर्फ बाळा भेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा मजकूर फलकांवर आहे. दरम्यान, २०१९ मावळ विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सुनील शेळके यांच्याकडून भेगडे यांचा ९० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. आता महायुतीसोबत असलेल्या अजित पवार यांच्या गटासोबत आमदार शेळके आहेत. महायुतीत विधानसभेची जागा शेळके यांना सुटेल असे गृहीत धरून भेगडे यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : लाल कांद्याच्या दरात घसरण; उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम

मावळ लोकसभा मतदारसंघात कशी आहे राजकीय परिस्थिती?

मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी, मावळमध्ये राष्ट्रवादीचे तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल, चिंचवडला भाजपचे आमदार असून उरणचे अपक्ष आमदार भाजपशी संलग्न आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा केवळ कर्जतमध्ये आमदार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा भाजप, राष्ट्रवादीची मावळत ताकद जास्त आहे.

Story img Loader