पुणे : माझा काही वैयक्तिक स्वार्थ असेल तर मी अजित पवारांची साथ सोडेल अस विधान मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुतीचा संविधान बद्दल विरोधकांनी अपप्रचार केला आणि मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका बसल्याने महायुतीच्या जागा कमी झाल्याचे शेळके म्हणाले आहेत. ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेळके म्हणाले, परतीच्या प्रवासात माझं नाव नाही. मावळ च्या जनतेने आमदार केलं, डोक्यावर घेतले. साडेचार वर्षा च्या काळात विश्वासहर्ता टिकवण्यासाठी अजित पवारांनी मला झुकत माप दिलं. माझा काही व्यक्तिगत स्वार्थ असेल तर अजित पवारांची साथ सोडेल. पण, मला अजित पवारांच्या प्रति आस्था असेल तर अजित पवारांची साथ सोडणार नाही हे मला कळतंय.
हेही वाचा…पहिल्याच पावसात पुणे ‘पाण्यात’ : मुसळधार पावसामुळे पंधरा ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडी
पुढे ते म्हणाले, जातीवाद आणि संविधान बदलणार असा विरोधकांनी अपप्रचार केला याचा फटका आम्हाला बसला. विधानसभेची निवडणूक ही वेगळी असेल. मुद्दे हे असतील. तिथं आम्ही चांगलं यश मिळवू. आमच्यात खदखद किंवा अंतर्गत संघर्ष नव्हता. अस ही शेळके म्हणाले. पुढे ते म्हणाले, श्रीरंग बारणेंना मंत्री पद भेटावं ही आमची इच्छा, त्यांना आमच्या शुभेच्छा. आम्ही याबाबत मागणी करणार आहोत. ते मंत्री होत असतील तर आम्हाला आनंद आहे.