पिंपरी : मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्याचवेळी मावळातील ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकावत आमदार शेळके यांना मंत्रिपदाची संधी मिळण्यासाठी मावळातील या शिलेदारांनी चक्क आकाशातून महायुतीच्या नेत्यांना गवसणी घालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकलेल्या फलकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद असे नमूद करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलकही झळकविण्यात आले. याखेरीज सुनील शेळके यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आदिती तटकरे, पंकजा मुंडे या संभाव्य मंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या फलकांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाबाबतची मावळवासीयांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. “आमचं ठरलंय” असा संदेश देणारे हे फलक मावळातील जनतेचा सरकारप्रती असलेला विश्वास आणि अपेक्षांचे प्रतीक ठरले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेने महायुतीच्या सरकारला तरुणाईची कल्पकता दाखवून दिली आहे. पॅराग्लायडिंगद्वारे अभिनंदन आणि मंत्रिपदासाठी अपेक्षा व्यक्त करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमने या अनोख्या उपक्रमाची धुरा सांभाळली. या उपक्रमात पंकज गुगळे, प्रवीण शिंदे, भाऊ गायकवाड, बाळासाहेब कुडले, गणेश शिंदे, गणपत नेवाळे, विकास शेलार, सनी कोळेकर, योगेंद्र भुल, दत्ता कोंढरे, दत्ता म्हाळसकर या तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हेही वाचा – सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मावळातील तरुणांनी दाखवलेला उत्साह आणि समर्थन ही महायुतीच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची साक्ष आहे. या अनोख्या पद्धतीने दिल्या गेलेल्या शुभेच्छांनी मावळ तालुक्याला राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या उपक्रमाने राजकारणातील पारंपरिक अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन तरुणाईच्या सर्जनशील दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे.तसेच मावळ तालुक्यातील नागरिक आमदार शेळके यांच्या रुपाने मंत्रीपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचा संदेश या अभिनव प्रयोगातून देण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval mla sunil shelke minister post mahayuti leader 11 paragliders pune print news ggy 03 ssb