मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे विश्वासू आमदार सुनील शेळके यांना सहज आणि सोपी वाटणारी निवडणूक अवघड असल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्यासमोर महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून आव्हानच नाही, असं म्हणणारे सुनील शेळके यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील बंडखोर बापू भेगडे यांचं आव्हान कडवं ठरत आहे. पक्षाचा राजीनामा देऊन बापू भेगडे यांनी बंडखोरी करत शेळके यांच्यासमोर दंड थोपटले. बंडखोर बापू भेगडे यांना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पाठिंबा आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात कार्यक्षम म्हणून आमदार सुनील शेळके यांची ओळख आहे. पूर्वाश्रमी भाजपचे असलेले आमदार सुनील शेळके यांना २०१९ मध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षात उडी घेऊन उमेदवारी मिळवत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला होता. अल्पावधीत अजित पवारांचे विश्वासू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. वेळोवेळी आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन अजित पवारांचा विश्वास संपादन केला.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा

हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरण : आमदार सुनील टिंगरे यांनी पाठविलेल्या नोटीशीत ‘यांची’ही नावे !

मावळमध्ये माझ्या विरोधात विरोधकांकडे निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी उमेदवारच नाही. अशा भ्रमात सुनील शेळके होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी पक्षाला राम- राम ठोकून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आणि थेट सुनील शेळके यांना आव्हान दिलं. हे नाट्य घडत असताना बापू भेगडे यांच्या पाठीमागे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पाठिंबा असल्याचे देखील वेळोवेळी समोर आलेलं आहे. मावळमधील अवघी भाजप भेगडे यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं आहे. बैठक होऊन पक्ष पदाचा देखील अनेकांनी राजीनामा दिला होता. अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतरही मावळमधील महायुती परिपूर्ण होऊ शकलेली नाही.

मावळ विधानसभा मतदारसंघात सहज निवडून येऊ अशी भाबडी आशा बाळगणारे सुनील शेळके यांना बापू भेगडे यांचं आव्हान मिळाल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ आली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्यापही शेळके यांच्या प्रचारासाठी महायुतीतील कुठलाही मोठा नेता आलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या मतदारसंघापासून दूर राहणे पसंत केले आहे. अजित पवारांनी पिंपरी- चिंचवड शहरात बैठक घेतली. परंतु, मावळमध्ये ते गेले नाहीत. ही सर्व राजकीय गणितं पाहिल्यानंतर २३ तारखेला मावळची जनता कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – पुणे : मोदींच्या सभेसाठी भाजपसह महायुतीसमोर ‘ हे ‘ आव्हान! स. प महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी होणार सभा

मला शरद पवार म्हणतात असं म्हणत दिला होता शेळके यांना इशारा…

शरद पवार यांनी देखील आमदार सुनील शेळके यांच्यावर वक्तव्य करत तंबी दिली होती. आमदार सुनील शेळके यांना आम्ही निवडून आणले. त्यावेळी पक्षाचा अध्यक्ष कोण होता? सभा कोणी घेतली होती? तुम्ही बैठकीला येऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी करता. पुन्हा असं केलं तर शरद पवार म्हणतात मला. अशाप्रकारे विधान करत शरद पवारांनी आमदार सुनील शेळके यांना चांगलं सुनावलं होतं. एकूणच आमदार सुनील शेळके आणि पवार कुटुंब असं वारंवार वाकयुद्ध गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळालं.

Story img Loader