आयुक्त राजेश पाटील हे सर्वसाधारण बैठकीमध्ये विषयांना केराची टोपली दाखवत आहेत. त्यांना राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सुपारी दिली आहे का? ते महानगर पालिकेचे मालक आहेत का?, ते परस्पर निर्णय घेत आहेत असे अनेक आरोप पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी आयुक्तांवर केले आहेत. तसेच, आम्ही नागरिकांची प्रश्न सोडवत असून आयुक्त पाटील हे त्यात खोडा घालण्याच काम करत असल्याचं देखील महापौर पत्रकार परिषदेत म्हणाल्या आहेत.

महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांना सुपारी दिली आहे. ते परस्पर निर्णय घेत असून सर्व साधारण सभेमधील विषयांना ते केराची टोपली दाखवत आहेत. आम्ही महानगर पालिकेत सत्ताधारी आहोत. नागरिकांसाठी काम करतो. नागरिकांची कामे, अडचणी सोडवण्याच काम करतो. त्यांच्या अडचणी सोडवत असताना आडवा आणि जिरवा या पद्धतीने आयुक्त राजेश पाटील हे काम करत आहेत.”

तसेच त्या पुढं म्हणाल्या की, “आम्हाला पुढंच पाऊल उचलाव लागेल. आयुक्त राजेश पाटील हे महानगर पालिकेचे मालक आहेत का? ते परस्पर निर्णय घेत आहेत. सर्वसाधारण सभेमधील विषयांना ते केराची टोपली दाखवत आहेत. ते पालकमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत. त्यांनी दबावाखाली न येता काम करावं, आयुक्त हे सर्वांचे असतात. आयुक्त हे नागरिकांचे आहेत की एखाद्या पक्षाचे? असा प्रश्न आहे. त्यांनी सर्व सोडून एखाद्या पक्षाची उमेदवारी मागायला हवी.”

Story img Loader