अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे यूजीसीला पत्र
‘मास्टर इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन’ (एमसीए) ही पदवी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची असून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ती विज्ञान शाखेतून काढून टाकावी, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आयोगाला पाठवले आहे.
एआयसीटीई आणि यूजीसीने निश्चित केलेल्या पदव्यांच्या नामाभिधानातील फरकामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गेले अनेक वर्षे नुकसान होते आहे. यातीलच एक अभ्यासक्रम म्हणजे एमसीए. ही पदवी यूजीसीने जुलै २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार विज्ञान शाखेत समाविष्ट केली आहे.
मात्र एआयसीटीईच्या नियमावलीनुसार ही पदवी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात गृहित धरण्यात येते. या तफावतीमुळे विद्यापीठांच्या पातळीवरही गोंधळ झाला आहे. या अभ्यासक्रमांना एआयसीटीईचे नियम लागू करायचे की यूजीसीचे नियम लागू करायचे याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर एमसीए ही पदवी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचीच असून यूजीसीने ती विज्ञान शाखेमध्ये समाविष्ट करू नये. त्या अनुषंगाने यूजीसीने त्यांच्या राजपत्रात बदल करावेत, असे पत्र एआयसीटीईने यूजीसीला पाठवले आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापन अभ्यासक्रमातील काही पदव्यांचाही यूजीसीच्या राजपत्रात समावेश करण्याबाबतची सूचना केली आहे. याबाबत भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी एआयसीटीई,
यूजीसी आणि विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा