लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : येरवड्यातील एन. के. गँगच्या म्होरक्या निखिल कांबळे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

Yerawada, murder, Criminal,
पुणे : येरवड्यात वैमनस्यातून सराइत गुन्हेगाराचा खून, तिघांना अटक
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Yerawada police arrested three people for robbed young man at gunpoint
पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
rajeshwari kharat new photo in wedding outfit netizens confused
“आम्हाला वेड्यात काढू नका”, जब्या-शालूचा लग्नाचा फोटो पाहून नेटकरी संभ्रमात; अनेकांनी केलं ट्रोल
The crowd at the Muslim League rally at the Maidan.
Direct Action Day: ७२ तासात सहा हजार हिंदूंचे शिरकाण; १६ ऑगस्ट हा दिवस भारत-पाकिस्तान फाळणीला कसा ठरला कारणीभूत?
Violence in West Bengal Viral Video
रडून, हात जोडून दयेची याचना करणाऱ्या कुटुंबावर हल्ला? Video मुळे हिंदू- मुस्लिम वादाची ठिणगी पेटली, पाहा खरं काय
पारंपरिक ‘सोवळ्या’ला पाश्चिमात्य साज

एन. के. गँगचा म्होरक्या निखिल उर्फ निक्या मधुकर कांबळे (वय २१), अतिब उर्फ बांडा अकील सय्यद (वय १९, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रुपेश गायकवाड (वय २२, रा. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेजवळ, येरवडा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. २४ ऑगस्ट रोजी कांबळे, सय्यद, गायकवाड आणि साथीदाराने येरवडा भागातील एका तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी चोरून नेली होती. कांबळे आणि साथीदारांनी येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, विमानगर भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

आणखी वाचा-खड्डे न बुजविल्यास पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्ते ताब्यात घेणार; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला ‘घरचा आहेर’

दहशत माजविण्यासाठी त्यांनी वाहनांची तोडफोड केली होती. कांबळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे, सचिन माळी, सचिन शिंदे, मोनिका पवार यांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला. मोक्का कारवाईचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.

Story img Loader