पिंपरी : चिखली, सांगवी आणि तळेगाव एमआयडीसीतील तीन टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

चिखलीतील टोळी प्रमुख करण रतन रोकडे (वय २५, रा. चिंतामणीनगर, चिखली) आणि त्याचे १२ साथीदार, सांगवीतील टोळी प्रमुख बाबा सैफन शेख,(वय २९, राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव) त्याच्या टोळीतील इतर पाचजण आणि तळेगाव एमआयडीसीतील टोळी प्रमुख अनिल जगन जाधव (वय २३, रा. वराळे, ता. मावळ) याच्यासह सहाजणांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
teacher student sweet joke
हास्यतरंग :  मिठाई…

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भावी नगरसेवकांची धडधड वाढली… आतापासूनच बंडाचा झेंडा हाती!

या टोळीतील आरोपींच्या विरोधात खून, खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही टोळ्यांतील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराच्या वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी वापर केला.

हेही वाचा – पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळ्यात तरुण वाहून गेला; शेवटचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल!

ही कारवाई सहपोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त स्वप्ना गोरे, काकासाहेब डोळे, सहायक आयुक्‍त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, ज्ञानेश्वर काटकर, सुनिल टोणपे, रणजित सावंत, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, दुर्गा खाडे, सुहास डंगारे, सचिन नांगरे, यांच्या पथकाने केली आहे.