पुणे : गणेशोत्सवात होणारी गर्दी, वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहे. गर्दीच्या रस्त्यांची पाहणी करण्यात येणार आहे. ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तेथील खड्डे बुजविण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सांगितले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. बैठकीत विविध मंडळांचे ६०० पदाधिकारी सहभागी झाले होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील, मनोज पाटील, शैलेश बलकवडे यावेळी उपस्थित होते .

tmc to install tire killers on roads in thane
विरुद्ध दिशेकडील वाहतुक रोखण्यासाठी ठाण्यात ‘टायर किलर’
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
adulterated edible oil, Food and Drug Administration,
मुंबई : भेसळयुक्त खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई; सणासुदीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
water release from Khadakwasla Dam for ganesh immersion
गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
pune police ganeshotsav marathi news
गणेशोत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष केंद्र; प्रथमच अशी व्यवस्था
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
Youth murder, hotspot, Hadapsar area,
पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना

हेही वाचा >>>भाजप आमदार राम शिंदे यांचा गुंड निलेश घायवळ यांच्यावर वरदहस्त : आमदार रोहित पवार

उत्सवाच्या काळात होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकेचे काम शहरात सुरू आहे. उत्सवाच्या कालावधीत विकासकामे संथगतीने करावीत. जेणेकरून कोंडी होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक नियोजनाची जबाबदारी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांकडून नियोजन करण्यात येणार आहे. गर्दीच्या मार्गाची पाहणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. खड्डे बुजविण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

मंडपामुळे वाहतुकीस अडथळआ होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेक मंडळे वर्गणी न घेता. उत्सव साजरा करतात. जाहिरात कमानीच्या माध्यमातून मंडळांना निधी उपलब्ध होतो. काही मंडळांकडून तात्पुरते स्टाॅल भाड्याने दिले जातात. स्टाॅल आणि कमानी उभ्या करताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

नवीन मंडळांच्या नोंदणीसाठी एक खिडकी योजना

ज्या मंडळांकडे परवाने आहेत. त्यांनी नव्याने परवाने घेण्याची गरज नाही. परवाने पाच वर्षांसाठी देण्यात आले आहेत. ज्या मंडळांकडे परवाने नाहीत. अशी मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले. मंडळांना काही अडचण आल्यास त्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

विसर्जन मिरवणुकीसाठी विभागनिहाय बैठका

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. विभागनिहाय बैठका अयाोजित केल्या जाणार आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली

दहा दिवस मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी

पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. उत्सवाच्या कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करून अमली पदार्थ विक्रीबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले.