अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ ला आणि सामाजिक कार्यकर्त्यां मीना कुर्लेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेला आणि व्यक्तीला ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा नवनिर्माण अभियानाला’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. व्यक्तीसाठी देण्यात येणारा पुरस्कार पीडित महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां मीना कुर्लेकर यांना देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे आणि ज्येष्ठ विचारवंत आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहेत. या वेळी वनमंत्री पतंगराव कदमही उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारीला भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलाच्या आवारात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

Story img Loader