प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात शनिवारी माध्यमांनाच लक्ष्य केले आणि प्रसारमाध्यमांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माझे काही चुकत असेल, तर जरूर चर्चा करा. संवादी सामर्थ्यांची बेरीज जमत नसेल तर मला आणि माझ्या भूमिकेला दोष देऊ नका, असेही ते म्हणाले.
मानदंड आणि अस्मिता यांच्यातील भेद आपल्याला समजला नाही. मानदंड आणि अस्मितेचे अहंकारात रूपांतर करून संतांच्या जातिनिहाय वाटणीमुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाले, असे डॉ. सबनीस यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकरी परंपरेने पूर्वीची भक्तिपरंपरा नाकारली. या भक्तिपरंपरेतील संतांनी प्रबोधनाच्या माध्यमातून माणसांना सुधारण्याचे काम केले. आम्ही मात्र त्यांना जातीत अडकवून फूट पाडली, असेही ते म्हणाले.
सध्याची सेक्युलॅरिझमची कल्पना ही धर्माची चिकित्सा सुरू करण्यापासून सुरू होते आणि धर्माचा विलय होईपर्यंत थांबते. मात्र सध्याचा सेक्युलॅरिझम हा धर्मनिरपेक्षतेपाशी आहे. उद्या तो निधर्मी होईल आणि परवा एखाद्या धर्माच्या विरोधातही जाईल, असे स्पष्ट करत सबनीस यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगाम्यांचे मारेकरी हे नथुरामच्या विचारसरणीचे आहेत, असा आरोपही केला.
डॉ. सबनिसांकडून माध्यमे लक्ष्य; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला
प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात शनिवारी माध्यमांनाच लक्ष्य केले आणि प्रसारमाध्यमांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 17-01-2016 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Media target by shripal sabnis in sahitya sammelan