मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाची ४४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाई हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

याप्रकरणी मयूर शशिकांत मालाणी (रा. सेव्हन हिल्स सोसायटी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक माॅडेल काॅलनीत राहायला आहे. त्यांच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून प्रयत्न करण्यात येत होते. मे २०१६ मध्ये बांधकाम व्यावसायिकाची मालाणीशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. त्याने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.

हेही वाचा >>>पुणे: पोलीस असल्याच्या बतावणीने महाविद्यालयीन युवकाकडे खंडणी

त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने मालणीने दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी ४४ लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे घेतल्यानंतर मालाणी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. पैसे परत मागितल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.