नारायणगाव : जुन्नर येथे आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे  शरद पवार गटाचे बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतलेली भेट चांगलीच  चर्चेत असून गुप्त भेटीत काय चर्चा झाली याबाबत उलटसुलट चर्चा आहे . तथापि अजित पवार यांनी बीड पाणी प्रश्नांची चर्चा सांगत भेटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला . 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्नर येथील सत्र न्यायालयाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले . अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात भेट झाली.  यावेळी तिथे कोणीच नव्हते .

या भेटी संदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, बीड शहरात वीस दिवस पाणी नाही , मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि बीडचा पालकमंत्री असल्याने यातून काहीतरी मार्ग काढा हे सांगायला आ. संदीप क्षीरसागर आले आहेत . क्षीरसागर विरोधी पक्षाचे जरी आमदार असले तरी मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे . म्हणून मला भेटायला येणारच . आम्ही पण विरोधी पक्षात असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला जायचो. पत्रकार लगेच या गोष्टीची ब्रेकिंग न्यूज करतात. बीड शहरात वीस दिवस पाणी नाही तातडीची गरज म्हणून ते मला भेटायला आले. मी ही अधिकाऱ्यांना फोन केला आहे . तातडीने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

या संदर्भात विचारणा केली असता संदीप क्षीरसागर म्हणाले कि, अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. बीड नगरपालिकेचा पाणी प्रश्न गंभीर हे नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना  तयार असुन वीजेचा प्रश्न असल्याने  पाणी उपलब्ध असुन  देखील देता येत नाही . या संदर्भात बैठक देखील घेतली होती मात्र, रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो होतो.   माजी आमदार अतुल बेनके माझे मित्र आहेत. कृषी उत्पन्न कार्यालयात अजित पवार येणार असल्याने त्यांना भेटायला आलो आहे.                          

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी देखील विधानसभेत विषय मांडला होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे.परंतु नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मतावर मी ठाम असल्याचे प्रतिपादन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.