लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटप अद्यापपर्यंत पूर्णपणे झाले नाही. मात्र या दोन्ही आघाडींमधील प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये मित्र पक्षाच्या नाराजीलादेखील सामोरे जावे लागत आहे. त्याच दरम्यान महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी होती. मात्र सन्मानजनक जागावाटप झाले नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसर्या बाजूला महायुतीमध्ये रामदास आठवले यांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले जात नाही. आठवले गटाला जागा दिल्या नाही. याबाबत आज पुण्यात रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत नाराजी बोलावून दाखवली. त्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत अनेक राजकीय घडामोडींबाबत भूमिका मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा