पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्‍न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर विमानतळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा >>> पुणे: मतदान यंत्रे चोरी प्रकरण तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोवले

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुरंदर विमानतळाची जागा बदलण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यात बोलताना पुरंदर विमानतळ जुन्या जागेवरच करण्याबाबत भाष्य केले होते. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा >>> पिंपरी: ‘इको पार्क’मधील वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन आंदोलन

येत्या दोन महिन्यात हा प्रश्‍न मार्गी लागेल असे, असे सांगितले होते. त्यामुळे विमानतळाचे काम मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचा निरोप सोमवारी संबंधित विभागांना पाठविण्यात आला होता. ही बैठक राज्य सरकारकडून अचानक रद्द करण्यात आली. याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. केवळ दोन ओळीचे पत्र राज्य सरकारकडून पाठविण्यात आले, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Story img Loader