राहुल खळदकर,लोकसत्ता

पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी परराज्यांमध्ये वास्तव्यास होते. ते देशभरातील बड्या अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे जाळे देशासह परदेशात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी न्यायालयात दिली. दरम्यान, ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदाराला न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या शनिवारी (३० सप्टेंबर) जप्त केले. ससून रुग्णालयात उपचार घेणारा ललित पाटीलला अमली पदार्थ देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेख यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ललित पाटील सोमवारी (२ ऑक्टोबर) ससून रुग्णालयाच्या उपचार कक्षातील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील, त्याचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक पसार झाल्यानंतर त्यांचा विशेष पथकाकडून शोध घेण्यात येत होता.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड: करोडपती झालेल्या ‘त्या’ पीएसआय ची चौकशी होणार, चौकशीनंतर कारवाई अटळ…?

भूषण आणि साथीदार अभिषेक यांना पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (९ ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील गोरखपूर परिसरातून अटक केली. त्यांना बुधवारी (११ ऑक्टोबर) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पाटील ससून रुग्णालयात होता. अमली पदार्थांचा पुरवठा करण्यापूर्वी भूषण आणि अभिषेक यांनी पाटीलचा साथीदार सुभाष मंडल याला अमली पदार्थाचा नमुना दिला होता. याबाबतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना उपलब्ध झाले आहे. मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाच्या विक्रीचे जाळे देशासह परदेशात आहे. अमली पदार्थ विक्रीत बडे तस्कर सामील असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

आरोपी भूषण आणि अभिषेककडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइल विदात (डेटा) तांत्रिक फेरफार करण्यात आले आहेत. संबंधित विदा सायबर तज्ज्ञांकडून मिळवण्यात येत आहे. अमली पदार्थ तस्करीतून पाटील आणि साथीदारांनी मोठी मालमत्ता खरेदी केली असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेफेड्रॉन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला कच्च्या मालाचा पुरवठा आरोपींना कोणी केला?, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करायची आहेत. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी युक्तिवादात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपी भूषण आणि साथीदार अभिषेक यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी एमपीएससीची नवी कार्यपद्धत… आता काय होणार?

पोलिसांना फटकारले

ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक यांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आल्यानंतर त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले. पोलिसांनी दोघांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. अमली पदार्थ तस्कर पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत होता. पोलिसांच्या निगराणीखाली तो उपचार घेत होता. पाटील पसार झाल्यानंतर पोलीस दलाची प्रतिष्ठा पणाला लागली. पाटील तुमच्या ताब्यात असताना तुम्हाला नीट सांभाळता आले नाही, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना फटकारले.