लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने येरवड्यातील संगमवाडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून १४ लाख रूपये किमतीचा ७० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

अली शेर लालमोहमद सौदागर (वय ६१ रा, संगमवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी संगमवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन जगदाळे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी सौदागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ७० ग्रॅम मेफेड्रोन सापडले. त्याच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच असा १४ लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आणखी वाचा-वाकडेवडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला, जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, रवीद्र रोकडे, चेतन गायकवाड, संदीप जाधव,महेश साळुंखे, दिशा खेवलकर आदींनी ही कारवाई केली.