लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अंमली पदार्थांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नगर रस्त्यावरील खराडी भागात पकडले. त्यांच्याकडून दोन कोटी २१ लाख ६० हजार रुपयांचे एक किलो १०८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

Ambernath Chemical Gas Leakage
अंबरनाथ शहरात पुन्हा वायू गळती; गुरुवारी रात्री मोरिवली, बी केबिन भागात नागरिकांना त्रास
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
cyber crime, Courier Scam, cyber criminals,
सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
drugs worth rs 2 crore seized from nigerian in nalasopara
नालासोपारा बनले अमली पदार्थांचे केंद्र; परदेशी व्यक्तीकडून २ कोटींचे अमली पदार्थ जप्त
anganwadi workers 500 crores marathi news
अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या, मेगाफोन खरेदीचा घाट

आजाद शेरजमान खान (वय ३५,रा. पिपलखेडी, जि. रतलाम, मध्यप्रदेश), नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय ३५,रा. अलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मध्य प्रदेशातून अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे जण खराडीतील स्नेहदीप सोसायटी परिसरात येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून खान आणि प्रजापती यांना पकडले.

आणखी वाचा- राजभवनच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेणारे चोरटे गजाआड

दोघांकडून मेफेड्रोन, एक हजार रुपये, पिशवी, प्रवासी तिकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या एक किलो १०८ ग्रॅम मेफेड्रोनची किंमत दोन कोटी २१ लाख ६० रुपये आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते, संदेश काकडे आदींनी ही कारवाई केली.