पुणे : मेफेड्रोन विक्री करणाच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नाना पेठेत पकडले. त्यांच्याकडून ११ लाख ४० हजार रुपयांचे ५७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अदीब बशीर शेख (वय २९, रा. पेन्शनवाला मशिदीजवळ, नाना पेठ), यासीर हशीर सय्यद (वय ३०, रा. मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक नाना पेठेत गस्त घालत होते. त्या वेळी अदीब शेख आणि यासीर सय्यद मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून ५७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत ११ लाख ४० हजार रुपये आहे. आरोपींकडून मेफेड्रोनसह १३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, संदीप जाधव, उदय राक्षे, योगेश मांढरे, युवराज कांबळे, इम्रान शेख, कल्याण बोराटे यांनी ही कामगिरी केली.