लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मेफेड्रोनची विक्री करणाऱ्य सराइताला अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवार पेठेत पकडले. त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयांचे ३२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सागर जयसिंग चव्हाण (वय ३४, रा. गायत्री भवनशेजारी, रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

रविवार पेठेत अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी साहिल शेख गस्त घालत होते. त्यावेळी सागर चव्हाण मेफेड्रोन विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती शेख यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चव्हाणला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. चव्हाणकडून मेफेड्रोनसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आणखी वाचा-पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, साहिल शेख, अझीम शेख, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, योगेश मांढरे, नीलम पाटील यांनी ही कारवाई केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने धानोरी भागात छापा टाकून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केली होती. नुकतीच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी एका कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्याला हाताशी धरून मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mephedrone worth six and a half lakhs seized from a drug dealer pune print news rbk 25 mrj