राज्यात तापमानाचा पारा चढू लागला असून, अनेक भागात रविवारी पारा चाळिशीजवळ पोहोचला आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा वाढला असून, अंगाची लाही-लाही होत आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक शहरात पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांच्या ठिकाणचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त आहे.
गेल्या काही दिवसात राज्यात वादळी पाऊस व गारपीट झाली होती. पावसाच्या सरीही पडल्या होत्या. त्यामुळे तापमान ३५ अंशांच्या खाली आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढू लागला आहे. मुंबईतही तापमान वाढले असून, घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
शहरांचे कमाल तापमान : पुणे ३९.४, जळगाव ४२.३, कोल्हापूर ३८.२, मालेगाव ४३.५, नाशिक ४०, सोलापूर ४०.८, मुंबई ३४.४, औरंगाबाद ३९.९, परभणी ४०.२, अकोला ४१.६, अमरावती ४१.८, चंद्रपूर ४०.४, नागपूर ४२.८ आणि वर्धा ४३ अंश सेल्सिअस.
पाऱ्याची चाळीशी!
राज्यात तापमानाचा पारा चढू लागला असून, अनेक भागात रविवारी पारा चाळिशीजवळ पोहोचला आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा वाढला असून, अंगाची लाही-लाही होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-04-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury rises above 40 c